फलटण टुडे (सातारा दि. 13 ): –
किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शासनाच्यावतीने 19 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांचेहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकार 18 ते 20 डिसेंबर पर्यंतच्या कालावधीकरिता प्रदान केले आहे.
या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन/ हालचाल कशी असावी, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत