फलटण टुडे (सातारा, दि. 13 ) : –
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मतदार नाव नोंदणी, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे व अन्य अशा मतदारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा संपर्क केंद्राची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात, सातारा येथे करण्यात आली आहे. संपर्क केंद्राचा टोल फ्री क्रमांक 1950 आहे. अडचणी असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.