पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 डिसेंबर रोजी आयोजन

फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 डिसेंबर रोजी कृष्णाकाठ इन्स्ट्ट्यिुट फॉर स्किल डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च, नगर परिषद जवळ कराड येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राकडून देण्यात आलेली आहे.

या मेळाव्यात 8 वी, 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल, अर्धकुशल कामगार अशा प्रकारच्या 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली आहेत. या रोजगार मेळाव्यास कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित रहावे, काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवहनही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!