जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –
   जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जागातील 23 वय वर्षाखालील तरुण-तरुणीकरीता त्याच्यातले कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

  स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरती करून निवड झालेल्या उमेदवारांची नांवे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. त्याअनुषंगाने 2024 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौंसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करीता इच्छूक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी 20 डिसेंबर पर्यंत https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी. याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, एस.टी. स्टॅडमागे येथे प्रत्यक्ष अथवा ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!