फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आले व हळद पिक लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, शेततळे अस्तरीकरण, सामुहिक तलाव, हरीतगृह, शेडनेट हाऊस, ट्रॅक्टर (20 एच.पी. पर्यंत) पॉवर टिलर, काढणीत्तोर व्यवस्थापन इत्यादी घटकांसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.