ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

  
 

 फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा पूर्वतयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट याबाबतची संपूर्ण माहिती करून घेण्याचे व पूर्व तयारीचा भाग म्हणून स्वतः प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.   

 

त्या अनुषंगाने जिल्ह्यांतर्गत आठही मतदार संघांना एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स वाटप करणेत आलेल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचने प्रमाणे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृतीबाबत मतदारसंघ निहाय प्रत्येक तहसिल कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. त्याबरोबर मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचे गाव निहाय प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी राबविण्यात येत आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!