फलटण टुडे (बारामती ):-
बारामती एमआयडीसी येथील भारत फोर्ज कंपनीमधील कर्मचाऱ्यांकरता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
भारत फोर्ज बारामती चे प्लांट हेड संजय अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून एच. आर. व्हाईस प्रेसिडेंट सदाशिव पाटील व अजित कुमार जैन, उदय रानडे , बसवेश्वर भैसे, सुनील चौधरी, महेश जाधव, अमोल फाळके, श्रेयश दबके, जयेश पाटील, किशोर शहा, किरण हिवरे तसेच,कामगार संघटनेचे निलेश घोडके, रंजीत भोसले, किरण खोमणे, अभिजीत काटे, राहुल बाबर, सागर कांबळे प्रशांत कुंभार आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव भेटावा म्हणून स्नेहसंमेलन त्याच प्रमाणे त्यांच्यामध्ये खिलाडी वृत्ती
जोपासावी व क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत यामध्ये क्रिकेट या खेळाचा प्रामुख्याने समावेश होतो या मध्ये सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होत असल्याचे संजय अग्रवाल यांनी सांगितले.
गुणवंत खेळाडू व संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते व खेळाडूंना प्रोत्साहित केले जात असल्याचे एच आर .व्हाईस प्रेसिडेंट सदाशिव पाटील यांनी सांगितले.
उपस्तितांचे स्वागत निलेश घोडके यांनी केले.