महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आंतर महाविद्यालय इनडोअर क्रिकेट स्पर्धा १७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे. हि आंतर महाविद्यालय महिला इनडोअर क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा अर्बन स्पोर्ट्स टर्फ, पार्क क्लब, केळुस्कर मार्ग, छ. शिवाजी महाराज मैदानाजवळ, दादर (प.) मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे.
प्रथम येणाऱ्या पहिल्या आठ महिला संघांना प्राधान्याने या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असून सदर स्पर्धेत मुंबई शहरातील नामांकित महाविद्यालये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंमधून मुंबई व महाराष्ट्राचा प्राथमिक संघ निवडला जाणार असून पुढे महाराष्ट्राचा अंतिम संघाची निवड केली जाणार असून तो संघ राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे. अधिक माहितीसाठी बाळ तोरसकर (९८६९१३५०८३). यांच्याशी संपर्क साधावा.