पुणे येथे 26 डिसेंबर रोजी डाक अदालत

फलटण टुडे (सातारा दि. 7 ): –
पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे यांनी 26 रोजी सकाळी 11.30 वाजता पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे यांच्या कार्यालयामध्ये 70 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

या डाक अदालत मध्ये पुणे क्षेत्रातील, पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील संबंधित पोस्टाच्या कार्यपद्धती विषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा. उदा तारीख ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नाव व हुदद् इत्यादी. संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार पी. ई. भोसले सहायक निदेशक डाक सेवाएं-1, पोस्टमास्टर जनरल चे कार्यालय, पुणे क्षेत्र, पुणे 411001 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक 15 डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!