फलटण टुडे (सातारा दि. 7 ): –
अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुल जवळ किंवा कार्यालयाच्या 02162-298106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.