फलटण पोलीस प्रशालाचे अधिकारी महाडीक साहेब यांचे स्वागत करताना कुरवली ग्रामपंचायतचे सरपंच राहूल तोडकर
फलटण टुडे ( कुरवली खुर्द दि.5) :-
फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द गावामध्ये मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी
पोलीस प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हा पोलीस प्रमुख मा. समीर शेख व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय मा. महाडिक साहेब यांच्या वतीने कुरवल खुर्द गावातील पाच दिव्यांग बांधवांना व्हील चेअर, कमोड चेअर व काठी चे वाटप करण्यात आले
कुरवल खुर्द ग्रामपंचायत कार्यालया मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग लाभार्थी सुनील दादासो तोडकर , सुशांत प्रभाकर घनवट , धीरज नंदकुमार नाळे, यांना व्हिल चेअर देण्यात आली तर दादासाहेब विठोबा अहिवळे यांना कमोड चेअर देण्यात आली व कमल मधुकर नरुटे यांना काठी चे वाटप पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले
यावेळी कुरवली खुर्द ग्रामपंचायती चे सरपंच श्री राहूल तोडकर माजी सरपंच श्री तुकाराम गोळे श्री महाडीक साहेब श्री शिरीष तोडकर , ग्रामसेवक श्री शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कुरवली ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार मानन्यात आले