फलटण टुडे वृत्तसेवा :-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी राजकोट किल्ल्यात सुरु असलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आणि मान्यवर उपस्थित होते.