फलटण टुडे (सातारा दि. 4 ) : –
बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आल आहे. अर्जाचा नमुना व माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर यांनी केले आहे.