बारामती मध्ये जागतिक अपंग दिन साजरा

अपंग व दिव्यांग यांना साहित्य वाटप करताना मान्यवर व दीपक गायकवाड व इतर

फलटण टुडे (बारामती ): –
रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिना निमित्त 
जागृती अपंग विश्वस्त संस्था च्या वतीने शहरातील गुणवडी चौक येथे अपंग व दिव्यांग दिना निमित्त अपंग व दिव्यांग यांना शालेय वस्तूचे व रग, ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले होते .
या प्रसंगी बारामती बँक चेअरमन सचिन सातव,उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर ,तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार विलास करे, बारामती नगर परिषद
 दिव्यांग अधिकारी अमर मुल्ला,पोलीस उपनिरीक्षक बाळासो जाधव, पंचायत समिती अपंग कल्याण अधिकारी संदीप शिंदे ,तलाठी राहुल जगताप व जागृती अपंग विश्वस्त संस्था चे अध्यक्ष दीपक गायकवाड,
उपाध्यक्ष अजीज शेख,कार्याध्यक्ष विनोद खरात,खजिनदार शेखर जाधव व प्रदीप शेंडे, कैलास शिंदे, दत्ता शिंदे, शिवराज डिस्टवाड आदी मान्यवर उपस्तीत होते.
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर अपंग व दिव्यांग यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश उल्लेखनीय असल्याचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.

अपंग व दिव्यांग यांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले .
समाजातील अंध, अपंग, मतीमंद कर्णबधीर व अन्य प्रकारचे लोक समाजातील अन्य नजरेतुन पाहतात तरी त्यांना समाजात मानाने जगता यावे यासाठी मा. राष्ट्रपती यांनी दि. ३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिवस म्हणून साजरा करतात व बारामती मध्ये विविध उपक्रम चे आयोजन करून अपंग व दिव्यांग यांना प्रोत्साहित करत असल्याचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगितले.या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन धनराज नींबाळकर यांनी केले तर आभार अजीज शेख यांनी मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!