फलटण टुडे (बारामती ):
इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडन यांच्या मान्यतेने १८० विश्व विक्रम करणारे १ भारतीय डॉ दीपक हरके यांच्या हस्ते अजित दादां चा १३६९ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कर्जत येथील रॅडिसन
ब्लू रिसोर्ट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी शिबिरात हा विश्वविक्रमी १३६९ गुलाबांच्या फुलांचा
गुच्छ डॉ दीपक हरके यांच्या हस्ते अजित पवार यांना देण्यात आला.
याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडन मध्ये करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रवक्ते सुप्रसिद्ध पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील व नगर चे लोकप्रिय आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रयत्नातून हा विश्व विक्रमी गुच्छ देण्यात आला.
इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडन चे चेअरमन डॉ दिवाकर सुकूल हे पुढील आठवड्यात लंडन हून मुंबई त येऊन या विश्व विक्रमचे प्रमाणपत्र दादांना देणार आहेत.
डॉ दीपक हरके यांच्या संकल्पनेतून नगर च्या शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्स ने हा विश्व विक्रमी गुच्छ बनविला आहे.