फलटण टुडे वृत्तसेवा: –
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी ३ डिसेंबरला होईल. दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या (व्यावसायिक) सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमती महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारल्या जातात. आजही त्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली असून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती २१ रुपयांनी वाढवल्या आहेत.