फलटण टुडे वृत्तसेवा :-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने २० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत भारताने ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला १५४ धावा करता आल्या.