फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई दि. १ ): –
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन ही घोषणा केली. बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.