बारामती मध्ये मराठी पाट्या लावा: मनसे चा इशारा

मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देताना पोपटराव सूर्यवंशी ,निलेश वाबळे व इतर पदाधिकारी

फलटण टुडे (बारामती ): –
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारामती नगरपरिषद हदमधील सर्व दुकाने, संस्था, आस्थापनावरील पाटया मराठीत लावणेबाबतच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या बाबत बारामती नगरपरिषद ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी. महाराष्ट्र निर्माण सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड पोपटराव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष ऍड निलेश वाबळे , तालुका संघटक ऋषिकेश भोसले , शहर उपाध्यक्ष ओम पडकर ,अजय कदम व इतर पदाधिकारी उपस्तीत होते.
राज्यातील सर्व दुकाने संस्था, आस्थापनावर मराठी पाटया लावण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने २५ नोव्हेंबरची मुदत दिलेली होती. परंतु बहुतांशी दुकानदारांनी मराठी पाटया लावण्याकरीता सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. इंग्रजी नावे ज्या आकारात केली त्याच आकारात मराठी अक्षरे करण्यात यावीत. त्यामुळे प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरूवात करावी. नगरपरिषद प्रशासनाने बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने, संस्था, आस्थापना यांची तपासणी करावी, कारवाई करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती करावी. तसेच मराठीत पाटया न लावणाऱ्या दुकानदारांवर खटले दाखल करण्यात यावेत अशी मागणी अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र निर्माण सेनेने केली आहे.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!