फलटण टुडे (सातारा दि. 30 ) :
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालये सुरु करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याचे कार्यालय सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण या नावाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003 या ठिकाणी दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पासुन सुरु करण्यात आलेले आहे.
या कार्यालयामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकासाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेतील लाभार्थ्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन नितिन उबाळे, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांनी केले आहे.