फलटण टुडे (सातारा दि.30) : –
जिल्हयातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यांत येतात. सदर जिल्हा लघु उद्योग पुरस्कार प्राप्त उद्योजकास प्रथम क्रमांकास रू. 15 हजार व दद्वितीय कमांकास रू. 10 हजार व मानचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देण्यात येते. सदर पुरस्कारासाठी लघु उद्योगांची निवड त्यांनी केलेली भांडवली गुंतवणूक तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता, कौटुंबिक पार्श्वभुमी, उत्पादित वस्तूंची गुणवत्ता, निर्यातक्षमता इत्यादी बाबींचा विचार करण्यात येऊन जिल्हास्तरीय समिती मार्फत लघु उद्योजकाची निवड केली जाते. जिल्हयातील पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत उपरोक्त बाबीकरीता गुण देऊन निवड करण्यात येते.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज, लघु उद्योग घटक हा मागील तिन वर्षे पूर्ण झालेला उद्यम नोंदणीकृत असावा. मागील तिन वर्षे उद्योग घटकाचे उत्पादन सुरू असावे. लघु उद्योग घटक कोणत्याही वित्तिय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी जिल्हा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त घटक जिल्हा पुरस्कार योजनेस पात्र राहणार नाही. सनदी लेखपाल यांचेकडील मागील तीन वर्षाचे ताळेबंदपत्रक व नफा तोटा पत्रक सादर करणे आवश्यक आहे.
जिल्हा पुरस्कार योजना 2023 करीता लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उद्योग घटकांनी दि. 22 डिसेंबर 2023 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन परिपूर्ण अर्ज या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं. ए-13, एमआयडीसी, सातारा, ता. जि. सातारा-415 004, दुरध्वनी क. 02162-244655, ई-मेल- [email protected] येथे संपर्क करावा