३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा चिंचणीत

धाराशिव, ठाणे व सांगलीची विजयी सलामी

फलटण टुडे (पालघर ३०, नोव्हेंबर) :-
 महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन के. डी. हायस्कूल, चिंचणी, पालघर येथे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील ४८ संघ आणि जवळपास नऊशेहून अधिक खेळाडू आणि पदाधिकारी , चिंचणी, पालघर येथे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने होणार्‍या या स्पर्धेची जोरदार तयारी पालघर जिल्हा खो-खो असोसिएशनकडून केली आहे.  

या स्पर्धेसाठी गटवारी पुढील प्रमाणे आहे.

किशोर गट : अ-गट: धाराशिव, पालघर, लातूर; ब-गट: सांगली, अहमदनगर, परभणी; क-गट: ठाणे, नंदुरबार, जालना; ड-गट: पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग; इ-गट: रत्नागिरी, जळगाव, रायगड; फ-गट: सोलापूर, धुळे, बीड; ग-गट: सातारा, मुंबई उपनगर, हिंगोली; ह-गट: नाशिक, छ. संभाजी नगर, नांदेड.

किशोरी गट : अ-गट: सांगली, परभणी, पालघर; ब-गट: ठाणे, छ. संभाजी नगर, सिंधुदुर्ग; क-गट: पुणे, लातूर, धुळे; ड-गट: रत्नागिरी, अहमदनगर, बीड; इ-गट: सोलापूर, नंदुरबार, जालना; फ-गट: नाशिक, रायगड, हिंगोली; ग-गट: धाराशिव, मुंबई उपनगर, नांदेड, ह-गट: सातारा, मुंबई, जळगाव.

आज झालेल्या किशोरांच्या उद्घाटनीय सामन्यात अ गटात धाराशिवाने लातूरचा २०-४ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. हरदया वसावे (३.२० मि. संरक्षण व ७ गुण), भीमसिंग वसावे (१.४० मि. संरक्षण व २ गुण) व महेश पाडवी (३ गुण) यांनी विजयात मोठा वाटा उचलला तर लातूरच्या विश्वजित नरवडे (१ मि. संरक्षण) यानेच थोडाफार प्रतिकार नोंदवला.

किशोरांच्या दुसर्या सामन्यात ठाण्याने जालानाचा १७-९ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवला. ठाण्याच्या ओमकार सावंत (२.१० मि. संरक्षण व ५ गुण), बासुराज काम्पापूर (२ मि. संरक्षण व १ गुण), विनायक भणगे(१.५० मि. संरक्षण व ३ गुण), महेश गौतम (१, २ मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार खेळ करत विजयाला गवसणी घातली तर उराभूत जालनाच्या कृष्णा मूळक व पवन मदन यांनी चांगला खेळ केला.  

किशोरींच्या उद्घाटनीय सामन्यात सांगलीने पालघरचा १२-५ असा एक डाव व ७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात सांगलीच्या वैष्णवी चाफे (५.१० मि. संरक्षण व २ गुण), वेदिका तामाखडे (१.४० मि. संरक्षण) व पायाल तामाखडे (१.३० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी शानदार विजय साकारला तर यजमान पालघरच्या मेहर रीतने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला.    

आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शानदार पार पडला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!