फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ) :-
शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच
आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यास मान्यता
• या अभियानात पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश
● विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक
तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार
• हे अभियान ४५ दिवसांमध्ये राबविण्यात येणार. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी
१०० गुण असतील
• मूल्यांकनातून प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन
क्रमांकासाठी निवड करण्यात येणार
• बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच ‘अ’ ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले
पारितोषिक २१ लाख, दुसरे पारितोषिक ११ लाख, तिसरे पारितोषिक ७ लाख मिळेल.
तर उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांना देखील तालुकाव, जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके
राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखाचे असून
दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखाचे असेल
• या अभियानासाठी २० कोटी ६३ लाख रुपये खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता