फलटण टुडे (बारामती ) : –
राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा बारामती मध्ये एक डिसेंबरला एमआयडीसी परिसरामध्ये येत आहे. त्यानिमित्त बारामती तालुका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने तिचे स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बारामती तालुका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष नानासाहेब थोरात, उपाध्यक्ष भारत जाधव ,कार्याध्यक्ष तानाजी खराडे ,सरचिटणीस गुरुदेव सरोदे, खजिनदार रंजीत भोसले, सह सरचिटणीस रमेश बाबर, सह खजिनदार मधुकर सावंत, सदस्य अजित भांडवलकर ,श्रीकांत कदम आशाबा शेख, आदी सदस्य व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य कौनसील यांच्या वतीने राज्यव्यापी महा संघर्ष जनजागर यात्रा २७ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत होणार असून कोल्हापूर ते नागपूर पर्यंत हा प्रवास होणार आहे.
या दरम्यान बारामती मध्ये तिचे स्वागत करण्यात येणार असून पेन्सिल चौक येथे दुपारी ४ वाजता भव्य सभा चे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी, कामगार,शेतकरी, मजूर,बेरोजगर ,महिला च्या न्याय हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदी विषयावर सदर जनजागरण संघर्ष यात्रा आहे. तरी बारामती, इंदापूर, कुरकुंभ, जेजुरी, फलटण आदी एमआयडीसी मधील कामगार ,मजूर ,विद्यार्थी, शेतकरी ,महिला यांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन बारामती तालुका कामगार संघटना कृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.