फलटण टुडे (बारामती ) :-
26 नोहेंबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी आत्मघाती हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेले पोलीस बांधव आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून एक जीव सेवा संघ बारामती सायकल क्लब साहस एडवेंचर यांच्या माध्यमातून रविवार २६ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते
ह्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन
इन्व्हरमेंटल फोरम च्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार ह्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी
विनय बाबुराव कणसे
पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षण केंद्र नानवीज दौंड – पुणे,
सुरेश खोपडे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि
भारत फोर्ज बारामती विभागचे अध्यक्ष ,संजय अग्रवाल व बारामती सायकल क्लब चे श्रीनिवास वाईकर ,उद्योजक सुधीर शिंदे, आभाळ माया ग्रुप, दुर्गवेडे बारामतीकर ग्रुप ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन ग्रुप ड्रीम डान्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी ह्या ग्रुपचे सदस्य उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे स्वागत संजय अग्रवाल अध्यक्ष भारत फोर्ज बारामती यांनी केले, प्रस्ताविक श्री बसवेश्वर भैसे यांनी केले आभार श्री अविनाश भोसले यांनी मानले तर सूत्रसंचालनाचे काम महेश जाधव यांनी केले, ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन हे एक जीव सेवा संघ, बारामती सायकल क्लब आणि साहस एडवेंचर यांनी केले होते ह्यात एकूण १०७ रक्तदाते यांनी रक्तदान केले