फलटण टुडे (जळोची ): –
बारामती तालुका मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती,स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा ०९ ते १८ ऑक्टोम्बर दरम्यान आयोजन करण्यात आले होते त्यास विद्यार्थी व युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला
या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणार्या पिढीने जपावा,म्हणून सदर गड-किल्ले बांधणी मोहिम मध्ये सहभागी स्पर्धेचे आयोजन केल्याचे मावळा जवान संघटना बारामती,शिवदुर्ग संवर्धन समिती अध्यक्ष प्रदीप ढुके यांनी सांगितले.
तालुक्यातील ५२० स्पर्धकांनी सहभाग घेतला काटेवाडी येथील महेश काटे आणि धणे वस्ती येथील उपक्रमातील सर्वानी उत्कृष्ट असा जंजिरा किल्ला बनविला तसेच हनुमान नगर माळेगाव येथील संकेत प्रकाश सातव,सातव वस्ती जय शेंडगे, अविष्कार जाधव, श्रेयस जाधव,तेजस जराड यांनी विविध गटात क्रमांक मिळवला. सहभागी ना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मावळा जवान संघटना चे दत्ता हरिहर,रमेश मरळ-देशमुख , अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्षा अर्चना सातव व ,शिवाजी घाडगे,प्रकाश सातव हे उपस्थितीत होते.
गड किल्ले यांच्या माध्यमातून नवीन पिढीस इतिहास समजावा व त्याचे संवर्धन होणे साठी सहभाग वाढावा म्हणून आशा स्पर्धेचे आयोजन केल्याचे अर्चना सातव यांनी सांगितले.