फलटण टुडे (बारामती ):
ऊस तोड मजुरांची दिवाळी गोड व्याहवी म्हणून रुई येथील रहिवासी व राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा अजिनाथ चौधर यांनी ऊसाच्या फडात जाऊन ऊस तोड मजुरांना मिठाई व दिवाळी फराळ व पणत्या (दिवा) चे वाटप केले.
या प्रसंगी विशाल चौधर, प्रदीप दराडे, जालिंदर चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.
ऊस तोड मजूर यांची दिवाळी गोड होणे साठी व घरामध्ये पणत्या लावता याव्या म्हणून वाटप केले सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना त्यांना सुद्धा इतरां सारखी दिवाळी साजरी करता आली पाहिजे म्हणून दरवर्षी सदर उपक्रम राबविला जाणार असल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
आधुनिक बारामती मध्ये माणुसकी आजही जिवंत आहे व दिवाळी भेट मुळे समाधान व आनंद मिळाला असल्याचे बीड जिल्यातील ऊसतोड मजूर महेश नागरगोजे यांनी सांगितले.
साईनाथ चौधर यांनी आभार मानले .