श्रीमती उषादेवी पांडूरंग भोसले यांचे अभिनंदन करताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, शेजारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे (दि. १८ ) : –
फलटण एज्युकेशन सोसायटी वार्षिक सभेत सोसायटीच्या माध्यमातून Artificial Intilljence ( कृत्रिम बुद्धिमत्ता)कोर्सेस सुरू करणेबाबत निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संस्था नियामक मंडळाच्या सदस्य बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणून श्रीमती उषादेवी पांडुरंग भोसले यांची निवड केल्याची घोषणा सेक्रेटरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.
फलटण एज्युकेश संस्थेचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सर्व सदस्य यांनी श्रीमती उषादेवी पांडूरंग भोसले यांचे अभिनंदन केले.