बारामती मध्ये किल्ले उभारण्याची लगभग

किल्ला बनवितांना व सजावट हर्षवर्धन बांदल

फलटण टुडे (बारामती ) :-

दिवाळीच्या सुटीत लहान मुलांचा आवडता उपक्रम म्हणजे किल्ला बनविणे. सुटीत कोणता किल्ला करायचा, याची खलबते अगोदरच झालेली असतात. त्यानुसार हे मावळे महाराजांच्या राजवटीतील वेगवेगळे किल्ले तयार करतात. त्यावर महाराज, सहकारी, मावळे, हत्ती, घोडे, तोफा आदी आकर्षक मांडणी करतात. या वेळी आपला किल्ला हुबेहूब असावा, याची विशेष काळजी घेतली जाते. महत्त्वाचे म्हणजे किल्ल्यावरील
बुरुंज, तळी, तोफा तैनात करणे तसेच

जंगल तयार करण्यासाठी मोहरी, हळीव पेरली जाते. त्याचबरोबर अरण्यातील प्राण्यांसाठी गुहा आणि चोरवाटा तयार होत आहेत. आता या किल्ल्यांना आकार येऊ लागल्याने मावळ्यांच्या पराक्रमाला दिवाळीत उजाळा दिला जात आहे.
दरम्यान, बारामती शहरातील विविध मंडळे, संस्था यांच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात राजगड, प्रतापगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जात आहे.
 या स्पर्धेला मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
बांदलवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल मधील इयत्ता नववी मधील हर्षवर्धन प्रविण बांदल याने पन्हाळगड किल्ला बनवून एतेहसिक माहिती संकलित केली आहे व प्रत्येक घटनेचा इतिहास सांगितला आहे बालवयात इतिहास समजणे साठी किल्ला बनविणे महत्वाचा भाग आहे दिवाळी मधील सुट्टीचा उपयोग किल्ल्या मुळे एतेहसिक होत असल्याचे हर्षवर्धन बांदल यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!