‘रागिणी’ दिवाळी विशेषांक 2023 प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा
फलटण टुडे ( बारामती ) :-
येथील रागिणी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासता यावी, औद्योगिक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा परिचय व बारामती मधील छोट्या मोठ्या उद्योगांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या संकल्पना समोर ठेवून ‘रागिणी’ दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
ह्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थान प्राचार्य सिताराम गोसावी यांनी भूषवले.तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. संजन मोरे , वनिताताई बनकर डॉ.सीमा नाईक गोसावी उपस्थित होते. पंचक्रोशी साहित्य मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कारचे व शुभांगी जाधव उपस्थित होत्या.
माधव जोशी, हेमचंद्र शिंदे यांनी संपादकांच्या दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या भूमिकांबद्दल आपले मत व्यक्त केले.
पुस्तक प्रकाशित करत असताना संपादकाला येणाऱ्या अडचणी आणि संपादकाची भूमिका व जबाबदाऱ्या किती महत्त्वाच्या असतात या मुद्द्यांवर या प्रकाशन सोहळ्यात उहापोह झाला. वाचन संस्कृती टिकावी,साहित्य चळवळ अधिक बळकट करणे किती महत्त्वाचे आहे या मुद्द्यांवरर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले.
डिजिटल जमान्यात सुद्धा लिखित साहित्य मानवी मनात खोलवर रुजत आहे. त्यासाठी लिखित साहित्य अधिकाधिक जतन करणे महत्त्वाचे आहे, याकरिता लेखकांना चालना दिल्यास सर्वसमावेशक साहित्य प्रकाशित होईल. डिजिटल युगात वाचन संस्कृती वाढली पाहिजे असा विचार प्राचार्य सिताराम गोसावी यांनी व्यक्त केला.
साहित्य क्षेत्रातील दर्दी मंडळींनी या प्रकाशन सोहळ्यास हजेरी लावली. आपले विचार मांडले,निश्चितच ते उपस्थितांसाठी प्रेरणादायी होते. आपल्या लेखणी च्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस असलेल्या दिग्गज मंडळींची या प्रकाशन सोहळ्यास मांदियाळी झाली होती. मान्यवरांचे अनुभव भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत, असे मत यावेळी रागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी व्यक्त केले.
रागिनी दिवाळी अंकाची माहिती घनश्याम केळकर यांनी दिली.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रागिणी फाउंडेशनच्या ऋतुजा आगम, ज्योती बोधे, सुजाता लोंढे, पूजा बोराटे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक पत्रकार अनिल सावळेपाटील यांनी केले.