फलटण टुडे (सातारा दि. 9) : –
भारतीय टपाल विभागाच्या सातारा विभागाने दिवाळी सण-2023 दरम्यान पाठवण्यात येणारे शुभेच्छा पत्र/टपाल (‘दिवाळी ग्रीटिंग्ज’) लवकरात लवकर पोहचवण्यासाठी जिल्हयातील काही मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये दीपावली भेट कार्ड स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सदर व्यवस्था सातारा विभागातील खालील मोठ्या टपाल कार्यालयात करण्यात आलेली आहे.
कार्यालयात दिवाळी भेट कार्ड स्वीकारण्यासाठी खालील प्रमाणे स्वतंत्र पत्र पेट्या किंवा ट्रे ठेवण्यात आलेल्या आहेत.
सातारा प्रधान डाकघर-415001, सातारा शहर-415002, एम.आय.डी.सी. सातारा-415004, संगमनगर सातारा-415003, वाई-412803, कोरेगाव-415501, लोणंद-415521, महाबळेश्वर-412806, फलटण-415523, पांचगणी-412805
या कार्यालयात दिवाळी भेटकार्ड स्वीकारण्यासाठी खालील प्रमाणे स्वतंत्र पत्रपेट्या किंवा ट्रे ठेवण्यात आलेल्या आहेत. सातारा शहर आणि जिल्हा (415001 ते 415540 पर्यंतचे पिनकोड 415301 ते 415499 सोडून), पुणे शहर (499 ने सुरु होणारे पिनकोड), पुणे जिल्हा (410 ते 412), सांगली जिल्हा (415 क्रमाक 1 मधील सोडून), कोल्हापूर जिल्हा (416), उर्वरित महाराष्ट्र (40 ते 44) उर्वरित भारत. तरी जिल्हातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी आपली दिवाळी भेट कार्ड पाठविण्यासाठी वरील व्यवस्थेचा लाभ घ्यावा.