काळखैरेवाडी गावची पंचवार्षिक निवडणूक बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री विशाल भैय्या भोंडवे व सर्व ग्रामस्थ काळखैरेवाडी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनसेवा ग्रामविकास पॅनेल व जनसेवा परिवर्तन पॅनेल यांच्या मध्ये सरळ लढत झाली. यामध्ये विशाल भोंडवे यांच्या पॅनेल ने दणदणीत विजय मिळवला. त्यांचे सरपंच पदासह 8 ग्रा.पं. सदस्य निवडून आले तर विरोधी पॅनेलचा 1 सदस्य निवडून आला.
2018 ते 2023 या कालावधीत सरपंच विशाल भोंडवे यांनी केलेल्या कामाची पोहोच मतदारांनी दिली असल्याची माहिती श्री भोंडवे यांनी दिली. गावातील सर्व पुढारी विरोधात असताना सुद्धा सर्व तरुणांना एकत्र करत ही निवडणूक त्यांनी जिंकली.
सरपंच पदी सौ.नम्रता तुषार कुतवळ यांची निवड झाली. त्यांना 882 मते मिळाली तर सौ.शितल सागर भोंडवे यांना 638 मते मिळाली.
*वॉर्ड 1*
बाळासाहेब रघुनाथ भोंसले 278
अंकिता संदिप भोंडवे 296
संगीता सुरेश भोंडवे 283
*वॉर्ड 2*
प्रशांत मंगेश खैरे 259
स्वाती सचिन भोंडवे 293
कोमल विजय कुतवळ 310
*वॉर्ड 3*
अजित गोरख काळखैरे 260
संगिता सचिन काळखैरे 244
सचिन छगन शेंडगे यांनी मोलाची साथ दिली. शेंडगे यांचा मात्र निसटता पराभव झाला. मतदारांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू व श्री विशाल भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास चालू ठेऊ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच सौ.नम्रता तुषार कुतवळ तसेच सर्व सदस्य यांनी दिली व सर्व मतदारांचे जाहीर आभार मानले.