धनगर समाजाच्या नागरिकांनी योजनांच्या माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन*

फलटण टुडे (सातारा दि. 5 ):
आदिवासी विकास विभागामार्फत अनूसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विकासासाठी 13 योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.या योजनांच्या माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे व 02162-298106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!