फलटण टुडे (फलटण) : –
आज माराठा क्रांती मोर्चा ने मराठा आरक्षणा साठी फलटण बंदचे आवाहन केले होते.
आज फलटण आगारातुन एकही बस सोडण्यात आली नाही, लांब पल्याच्या बसेस ही आगारात ऊभ्या होत्या, एकुण १८९ फेर्या रद्द करण्यात आल्या.अंदाजे १७५५४ कीलो मिटर रद्द झाले.अंदाजे ३.५ ते ३.७५ लाख ऊत्पन्न बुडाले अशि माहीती प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी दीलि.
प्रवाशांच्या व बसेस च्या सुरक्षे साठी आज फलटण आगार पुर्ण बंद होता, फलटण आगाराच्या कोणत्याही बसचे नुकसान झाले नाही तसेच फलटण हद्दीत ईतर आगाराच्या कोणत्याही बसेस चे नुकसान झाले नाही.