'श्रायबर' कामगार पतसंस्थेची चौकशी करण्याचे आदेश

अपहार केल्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई

फलटण टुडे(बारामती ) :-
 बारामती एमआयडीसी येथील श्रायबर डायनामिक्स डेअरीज कामगार सहकारी पतसंस्थेमध्ये अपहार केल्याच्या तक्रारी आल्यानंतर सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी एस. एम. बोबडे, ए. एस. महानवर, एस. एम. दांगडे, के. डी. मोरे या चार सदस्यांची चौकशी समिती नेमून संस्थेच्या कामकाजाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात मिलिंद टांकसाळे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की, श्रायबर डायनामिक्स डेअरीज कामगार सहकारी पतसंस्थेच्या २१८ सभासद व कामगार युनियन अध्यक्षांनी लेखी अर्ज देऊन संस्थेची mv २०१६ ते आजअखेर आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी असे नमूद केले आहे.

पतसंस्थेचे चेअरमन अमोल एकनाथ मोरे यांनी सहायक निबंधकांकडे लेखी अर्ज दाखल केला आहे. यात नमूद केले आहे की,

संस्थेचे सचिव सुनील माणिकचंद शहा हे दप्तरी कामकाज पाहत आहेत. सन २०२१-२०२२ चे सर्व दप्तर तपासता त्यात अनियमितता आढळली आहे. काही चेक सचिवांनी परस्पर स्वतःच्या खात्यावर वर्ग केल्याची शक्यता आहे. प्राथमिक चौकशीनंतर ७० लाख ७५ हजारांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संस्था सहकारी कायदा व उपविधीतील तरतुदींचे योग्यरीत्या पालन करते किंवा कसे, संस्थेचे दप्तर व हिशोबांच्या नोंदवह्या योग्य त-हेने विहित नमुन्यात ठेवलेल्या आहेत काय, संस्थेचा व्यवसाय व्यावसायिक तत्त्वानुसार सुरळीत सुरु आहे काय, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शासकीय धोरणांची कायद्यातील तरतुदीस अनुसरून अंमलबजावणी केली जाते काय किंवा कसे या बाबींची खात्री करून घेण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समितीच्या वतीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!