वुई द फ्युचर ग्रुप चा रौप्यमहोत्सव उत्साहात साजरा

 

वुई द फ्युचर ग्रुप च्या होम मिनिस्टर मधील विजेत्या समवेत मान्यवर
फलटण टुडे(बारामती ) :- 
आरोग्यासाठी व्यायाम करणे व त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध उपक्रम राबवित स्वतःचे वेगळेपण जपत असताना एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे दाखवीत बारामती येथील वुई द फ्युचर ग्रुप चा रौप्यमहोत्सव उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी वुई द फ्युचर ग्रुप चे अध्यक्ष राजेंद्र मेहता , ग्रुप चे सदस्य व पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग कचरे, मा. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, ग्रुप चे सोशल मीडिया प्रमुख चारुदत्त पेंढारकर, कायदेशीर सल्लागार ऍड सविन आगवणे, ऍड विजयसिंह मोरे, डॉ पांडुरंग जिरगे व खजिनदार शब्बीर कायमखाणी व इतर मान्यवर सभासद व कुटूंबीय उपस्तीत होते.
१९९९ साली नीरा डावा कालव्याच्या भरावावर आरोग्यासाठी व्यायाम होणे साठी चालणे, पळणे, योगा करणे आदी साठी ४ सभासद एकत्र येऊन 
वुई द फ्युचर ग्रुप ची स्थापना करण्यात आली त्यानंतर व्यायाम प्रेमी वाढत गेले व्यायाम करीत विविध धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणे सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान, वृषरोपण,अनाथ आश्रम व मतिमंद मुलांना मदत, पूरग्रस्त व ओढा खोलीकरण व रुंदीकरण साठी मदत करण्यात आली व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत ग्रुप आरोग्याचा रौप्यमहोत्सव साजरा करीत असल्याचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी सांगितले.
या प्रसंगी दिवंगत सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर महिला साठी अनिल सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये प्रथम क्रमांक विमल गोलांडे, द्वितीय विजया बनकर, तृतीय शोभा सोमाणी या विजयी झाल्या.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सभासद व त्यांची मुले यांचा सत्कार करण्यात आला.
आभार मनोज खुंटाळे यांनी मानले 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!