बारामती: प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर येथे दि.२६ ऑक्टोम्बर रोजी सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली सदर सरपंच निवडीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
त्यामध्ये बाळासो मारुती चांदगुडे यांना एकूण उपस्थित सात सदस्य पैकी सहा मते मिळाली व श्री बाळासो मारुती चांदगुडे यांची सरपंच पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस. मुळे यांनी जाहीर केले.
या प्रसंगी
उपसरपंच सुखदेव नाळे ,सदस्य प्रमोद चांदगुडे , सौ सुप्रिया चांदगुडे ,सौ नीलम चांदगुडे ,सौ माया आहेरकर , पोलीस पाटील बाळासो गवळी व ग्रामस्थ ग्रामपंचायत बऱ्हाणपूर नेपथ वळण उपस्थित होते .
गावच्या विकासाला प्राधान्य देत असताना शासकीय योजना सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवणार असल्याचे निवडीनंतर सरपंच श्री बाळासो मारुती चांदगुडे यांनी सांगितले.