*
फलटण टुडे (बारामती ):
कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियाच्या हितासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन इमसोफर मॅन्युफॅक्चरींग एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष रमेश बाबर यांनी केले.
इमसोफर एम्प्लॉईज युनियन चा वर्धापन दिन व निवडणूक होऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वचन पूर्ती कार्यक्रमात अध्यक्ष रमेश बाबर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी
सचिव अमोल पवार,उपाध्यक्ष संदिपकुमार बिचकुले,कार्याध्यक्ष प्रविणकुमार थोरात, खजिनदार चंद्रशेखर नाळे,खहसचिव आनंदकुमार जाधव,
सहखजिनदार सचिन पिंगळे,
सदस्य संतोष पवार,भाग्यश्री माने
लक्ष्मी धेंडे,रमोला आवाळे
आदी मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
या प्रसंगी युनियन फलकाचे पूजन करण्यात आले व कामगार विजयी गीत गाऊन व घोषणा देण्यात आल्या.
उत्कृष्ट वेतन करार व प्रत्येक कर्मचारी व त्याचे कुटूंब आर्थिक सक्षम झाले पाहिजे या साठी प्रत्यनशील असून कर्मचाऱ्यांची भक्कम साथ व पाठिंबा यामुळे युनियन च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रत्यन असतो व तो यशस्वी झाले तरी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रत्यनशील राहणार असल्याचे रमेश बाबर यांनी सांगितले
स्वागत अमोल पवार यांनी केले तर आभार प्रविणकुमार थोरात यांनी मानले.