फलटण टुडे (बारामती ):
इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला संग्राम निलेश घोडके न थकता,एका वेळेस २२ किलोमीटर अंतर असलेला अतिशय अवघड व बाजूला असलेल्या अरुंद दऱ्या ,विरुद्ध बाजूने येत असलेला थंड वारा या सर्वांना सामोरे जात देव भूमी असलेला उत्तराखंड येथील श्री केदारनाथ यात्रेचा मुख्य अवघड असा २२किलोमीटर ट्रेक न थांबता पहाटेच्या वेळी अवघ्या ५ तासात पूर्ण करून केदारनाथ चे दर्शन करून कमी वयात व कमी वेळेत सदर ट्रेक पूर्ण करण्याचा मान मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
या वेळी त्याचे वडील भारत भारत फोर्ज कंपनीचे कामगार युनियन सदस्य निलेश घोडके व सतीश घोडके दत्तात्रय हाडके,दत्तात्रय चांदगुडे व मराठा नगर युवक प्रतिष्ठान बारामती चे सदस्य उपस्तीत होते.
उत्तराखंड पर्यटन मंडळाचे सदस्य योगीराज त्यागी व इतर सदस्य यांनी संग्राम घोडके यांचा सत्कार केला.
शालेय जीवनात अभ्यास महत्वाचा असतो परंतु साहस व पर्यटन याची इतभूत माहिती मिळण्यासाठी पर्यटन महत्वाचे आहे त्या शिवाय खरा भारत कळणार नाही म्हणून पर्यटन करा त्यास ट्रेक ची जोड द्या असे आव्हान या वेळी संग्राम घोडके यांनी केले.