आसू गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार व राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी



फलटण टुडे (आसू आनंद पवार ): –

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात प्रथमच मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला असून येथून पुढे कोणतेही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात.
सकाळी आसू बसस्थानका समोर सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आले.
आसू तालुका फलटण या गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार टाकला असून आम्ही फलटण तालुक्यातील सर्व सकल समाज मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन करणारा असून आमच्या हजारो पिढ्या बरबाद झाले आहेत इथून पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्वांच्या बरोबर असणार व मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढवण्यासाठी सज्ज असून येत्या २५ तारखेला फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मराठा क्रांती समाजाचे माऊली सावंत व यशवंत खलाटे पाटील यांनी यावेळी बोलताना. व्यक्त केले.
मराठा समाज पूर्वीचा व आताचा यामध्ये खूप बदल झाला असून आज नोकरी शिक्षणामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज आहे पूर्वी समाजामध्ये गरज नव्हती पण आता ती गरज महत्वाची आहे आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून छत्रपती घराण्याची आमचे नातेसंबंध आहेत त्यामुळे मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी दिला.
सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पूढार्‍यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार असा मोठा फलक एसटी बस स्थानकासमोर लावण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार स्वामी साबळे यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!