सांगली येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
मैदानी क्रीडा स्पर्धेत विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मा प्राचार्य बाबासाहेब गंगवणे ,प्रशिक्षक डी. एन जाधव व इतर मान्यवर
फलटण टुडे (सातार ) :
नुकत्याच पार पडलेल्या सातारा येथील सातारा जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शाहू स्टेडियम येथे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या .
या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण चे विद्यार्थी प्रणव कैलास निंबाळकर याने 400 मीटर हारडल्स धावण्यात तर साहिल संजय शिंदे याने 800 मीटर धावणे या मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये या दोघांनीही द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
त्यांच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषद सदस्य मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र ॲम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासनाधिकारी अरविंद निकम ,तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा ,प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य ए वाय ननावरे , ज्युनिअर चे उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख , पर्यवेक्षक व्ही जी शिंदे , जी ए जाधव , सौ.माळवदे , क्रीडा शिक्षक (वस्ताद ) जाधव डी एन , क्रीडा विभाग प्रमुख धुमाळ सचिन , प्रसिद्धी प्रमुख अमोल नाळे ,क्रीडा मार्गदर्शक बी बी खुरंगे ,क्रीडा प्रशिक्षिका धनश्री क्षीरसागर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या