नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्राचे तगडे खो-खो संघ जाहीर


फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, १८ ऑक्टो, (क्री. प्र ) : –
                गोवा येथे ४ ते ८ नोव्हेंबर या कलावधीत होणार्‍या ३७ व्या नॅशनल गेम्स खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिलांचा प्रत्येकी १५ जणांचा संघ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर तीन-तीन राखीव खेळाडू सुध्दा जाहीर केले आहेत. 

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या खो-खो संघाची घोषणा सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केली. काही दिवसांपुर्वी धाराशिव येथे झालेल्या निवड चाचणीतून संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणुक केली होती. 

संघातील निवड झालेल्या खेळांडूचे मा.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र संघात तगडे खेळाडू सहभागी असून राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करतील असा विश्‍वास डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केला. तर सचिव अ‍ॅड. शर्मा यांनी खेळाडूंना अव्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुरुष संघ : –
 सुयश गरगटे, आदित्य गणपुले, राहुल मंडल, वृषभ वाघ (सर्व पुणे), अक्षय भांगरे, ओंकार सोनावणे, हृषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), लक्ष्मण गवस, संकेत कदम (सर्व ठाणे), अक्षय मसाळ, सौरभ घाडगे (सर्व सांगली), रामजी कश्यप (सोलापूर), फैझांखा पठाण (विदर्भ), सुशांत काळढोण ( (सर्व कोल्हापूर)निखिल मस्के (धाराशिव), राखीव खेळाडू : दिलीप खांडवी (नाशिक), अभिजित पाटील (कोल्हापूर), दुर्वेश साळुंखे (मुंबई उपनगर), प्रशिक्षक – डलेश देसाई (मुंबई), सहाय्यक प्रशिक्षक : युवराज जाधव (सांगली) व्यवस्थापक – प्रशांत इनामदार (सांगली), फिजिओ – अमित राव्हटे (सांगली)  

महिला संघ : –
प्रियांका भोपी, पूजा फरागडे, रुपाली बडे, रेश्मा राठोड (सर्व ठाणे), किरण शिंदे, गौरी शिंदे, रुतुजा खरे, संपदा मोरे (सर्व धाराशिव), काजल भोर, प्रियांका इंगळे, दिपाली राठोड (सर्व पुणे), निशा वैजाळ (नाशिक), प्रिती काळे (सोलापूर), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी), राखीव खेळाडू : स्नेहल जाधव (पुणे), अश्विनी शिंदे (धाराशिव), वैष्णवी पोवार (कोल्हापूर), प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : जयांशू पोळ (जळगाव), व्यवस्थापिका – सुप्रिया गाढवे (धाराशिव).

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!