मुधोजी मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम प्रसंगी प्रशालाचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना पर्यवेक्षक व्ही जी शिंदे  ग्रंथपाल सौ अनिता बडवे व इतर मान्यवर
फलटण टुडे ( फलटण ) : –
१४ ऑक्टोबर रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त फलटण येथेली ‘मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ‘ मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या वेळी विविध पुस्तकांचे वाचन केले.मान्यवरांच्या उपस्थितीत या वेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी ग्रंथाचे पुजन करण्यात आले.
 
प्राचार्य बाबासाहेब गंगवणेअध्यक्षस्थानी होते या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य यांनी वाचनाचे महत्त्व व वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे असे याप्रसंगी सांगितले

पर्यवेक्षक व्ही जी शिंदे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की वाचनामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्ती मत्व संपन्न होते संस्कार मिळतात तो विद्यार्थी शब्दसंग्रह वाढल्यामुळे आपले विचार अधिक परिणामकारक रित्या मांडू शकतो .

तर ग्रंथपाल सौ बडवे ए ‌एस यांनी सांगितले की पुस्तके आपली आकलन क्षमता वाढवतात निराशेच्या गर्तेत सापडलेल्या अनेकांना पुस्तकांनी मार्ग दर्शन करून त्यातून प्रेरणा मिळून अशा अनेक नी आकाशाला गवसणी घातली आहे श्यामची आई,मन मैं है विश्वास,झोंबी,मी वनवासी,मी एक स्वप्न पाहिलं अशा अनेक पुस्तके आपल्याला प्रेरणा देतात.

कु टी. .व्ही. शिंदे यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याबद्दल बहुमोल अशी माहिती दिली.

तर पुस्तक वाचन माणसाला आतून सुखी आणि शांत बनवत प्रत्येक गोष्ट मधून मार्ग कसा काढायचा हे पुस्तक शिकवते गुरू मार्गदर्शक म्हणून पुस्तक उपयोगी असतात असे मत सौ एस. सस्ते यांनी व्यक्त केले .

 सौ लतिका अनपट, सौ ए ए नाईक निंबाळकर , कु संगिता कदम , सौ उज्वला पिसाळ , सौ वनीता लोणकर यांनी ‘मी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम बोलतोय’ व ‘वृत्तपत्र वाचन काळाची गरज’ या विषयावर मनोगत व्यक्त केले व कविता सादर केली. 
 
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख , पर्यवेक्षक व्ही. जी . शिंदे , ग्रंथपाल सौ अनिता बडवे , शिक्षक प्रतिनिधी सौ लतिका अनपट, सौ एस. सस्ते , कु टी. .व्ही. शिंदे , सौ ए ए नाईक निंबाळकर , कु संगिता कदम , सौ उज्वला पिसाळ सौ वनीता लोणकर , सचिन धुमाळ , प्रदिप अभंग , संजय गोफणे , अमोल नाळे , शंकर तडवी , संदीप पवार ,स्वप्नील गोंधळी , रमेश रिटे हे उपस्थिती होते .


प्रास्ताविक सौ . लतीका अनपट यांनी तर सुत्रसंचलन कु. टी. व्ही. शिंदे यांनी केले तर आभार सौ. वनीता लोणकर यांनी मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!