फलटण टुडे (बारामती):
दि. १२ ऑक्टोबर २०१३ रोजी (शिरूर – जातेगाव) या ठिकाणी १४, १७, १९ या वयोगटातील मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील १३ तालुके सहभागी झाले होते. मर्यादित विद्यार्थी संख्या असणाऱ्या जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेली १० वर्ष तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
या विद्यालयात अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. या संघाने झालेल्या जिल्हास्तर कबड्डी स्पर्धेत बारामती तालुक्याचे नेतृत्व केले. यामध्ये अनेक संघावर मात करत, अनेक तालुक्यांशी चुरशीची लढत देत तृतीय क्रमांक पटकवला. यासर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे व शिक्षक श्री. अजिंक्य साळी यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, उपाध्यक्ष मा.श्री. सतिश गायकवाड, खजिनदार मा.श्री. सतिश धोकटे सर्व संचालक तसेच आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी केले