फलटण टुडे (बारामती ):
बारामती एमआयडीसी मधील व्ही. आर. बॉयलर सोल्युशन चे चेअरमन राजाराम सातपुते यांना २०२३ चा रियल अचिव्हर्स ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे, येथे १४ ऑक्टोबर रोजी
गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या रिअल अचिव्हर्स या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांचा कार्यपरीचय करून देणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. तसेच शिक्षण व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळी राजाराम सातपुते यांचा पुस्तकामध्ये कार्य परिचय व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,रिअल अचिव्हर्स पुस्तकाचे लेखक गौतम कोतवाल,
संजय दिवेकर- अध्यक्ष कै. एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, सिद्धांत यादव – अध्यक्ष सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, मनीषा लोहोकरे – संचालक मातोश्री इंटरनॅशनल स्कूल वारजे, पृथ्वीराज प्लास्टिक प्रा.ली. चे चेअरमन दिनेश भागवत व मराठा सिक्युरिटी इंटेलिजन्स चे संचालक प्रवीण जगताप व व्याख्याते अनिल सावळेपाटील इतर मान्यवर उपस्तीत होते .
बारामती मध्ये बॉयलर अटेंडन्स म्हणून काम करीत असताना उद्योजक म्हणून कोणतेही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अनुभव व जिद्दीच्या जोरावर स्वतः ची व्ही आर बॉयलर सोल्युशन कंपनीची स्थापन करून अनेक नामांकित व छोट्या मोठ्या कंपन्यांना गुणवत्ता व दर्जात्मक कामे वेळेवर देऊन अनेकांना रोजगार निर्मिती प्राप्त करून दिली या कार्याची दखल घेऊन ‘रियल अचिव्हर्स ‘ पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजक लेखक गौतम कोतवाल यांनी सांगितले.
उद्योजक यांनी मनुष्यबळ व आर्थिक व्यसवस्थापन उत्कृष्ट ठेवावे प्रसंगी पडेल ते काम करून समोरचा ग्राहक वेळेत संतुष्ट करावा तरच आणखीन ऑर्डर वाढतील व यश सहज प्राप्त होणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना राजाराम सातपुते यांनी सांगितले.
—————-