पारंपरिक पद्धतीने बैल पोळा साजरा करून विवाह संपन्न

बैल पोळा व विवाह संपन्न करताना जळोची ग्रामस्थ

फलटण टुडे (बारामती ):  
तालुक्यातील जळोची येथे शनिवार १४ रोजी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करून शुभ विवाह सुद्धा संपन्न झाला.
प्रथम बैलांना व गाईला हळदी लावण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात मलगुंडे वस्ती ते जळोची गाव अशी मिरवणूक काढण्यात आली व ग्रामदैवत काळेश्वर चे दर्शन घेण्यात आले, मिरवणुकीनंतर पारंपरिक पद्धतीने मंत्रपोचार करीत वरमाला घालून व उपस्तीत वऱ्हाडी ग्रामस्थ यांना भोजन देऊन विवाह सोहळा मलगुंडे वस्ती या ठिकाणी संपन्न झाला. 
या प्रसंगी शेतकरी 
 जगन्नाथ मलगुंडे, पोपट मलगुंडे, गणपत मलगुंडे,देव गवळी,अभिजित वणवे, संतोष मलगुंडे, भिवा मलगुंडे, त्रिंबक मलगुंडे, अनिल मलगुंडे, आप्पा मलगुंडे, संदीप मलगुंडे, अविनाश मलगुंडे, सचिन मलगुंडे व कुटुंबिय उपस्तीत होते.
 पाखऱ्या,राज्या, सर्ज्या,पोपट्या, उल्लास ही बैल जोडी तर-चंद्रा, हरणी,नर्मदा, गवळी ही गाय जोडीचा विवाह संपन्न झाला.
वर्षभर शेतात राबणारा बैल व दुध देणारी गाय खरे पशुधन होय त्यामुळे बाजारातून नवीन आणलेली गाई बैल त्यांचे पूजन करून विवाह लावणे ही प्रथा आहे या प्रमाणे विवाह लावला जातो व त्यांच्या बदल कृतज्ञता व्यक्त केली जात असल्याचे शेतकरी संतोष मलगुंडे यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!