फलटण टुडे (फलटण) :
फलटण नगर परिषदेचे माजी.नगराध्यक्ष प्रख्यात वकील प्रियदर्शनी लॉ कॉलेज फलटणचे सचिव ॲड.रमेशचंद्र उर्फ नाना भोसले यांचे आज रोजी सकाळी साडेआठ वाजता दुःखद निधन झाले ते ८६ वर्षाचे होते .राजे गटाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिचित होते.फलटण नगर परिषदेचे माजी.उपनगराध्यक्ष नितीनभैया भोसले यांचे ते वडील होत.त्यांच्या मागे पत्नी,मुले,सुना,नातवंडे,असा परिवार आहे. शंकर मार्केट ब्राम्हण गल्ली येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी दुपारी ४-०० वाजता त्यांचे पार्थिवदेह दहा मिनिटांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.अंतयात्रा संग्राम पेट्रोलियम जिंती नाका येथील त्यांच्या वस्तीवरील निवासस्थानावरून दुपारी ३-३० वाजता निघणार असून वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे ४-३० वाजता अंत्यविधी होणार आहे.