बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप
फलटण टुडे (बारामती ): –
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कामापुरता करावा त्यास विनाकारण वेळ दिल्यास जीवनातील अमूल्य वेळ वाया जाईल त्याचप्रमाणे मदतीचे मूल्य हे गरजेवर अवलंबून असते कठीण परिस्थितीत मदत ही महत्त्वाची असते त्याची किंमत होऊ शकत नाही असे प्रतिपादन बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
बारामती तालुका मराठा सेवा संघ यांच्या वतीने ‘ जिजाऊ शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत लाभार्थीं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महेश रोकडे बोलत होते .
या वेळी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे ,विश्वस्त देवेंद्र शिर्के, मनोज पोतेकर, प्रदीप शिंदे, पोपटराव गवळी, दीपक बागल, व्यवस्थापक अमोल चांदगुडे , पत्रकार अनिल सावळेपाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक फिरोज मुलाणी,व्यवसाईक जमीर शेख व निरंजन पाटील आदी मान्यवर व विद्यार्थी ,पालक उपस्तीत होते.
जिद्द चिकाटी आत्मविश्वास च्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकता त्यामुळे एका प्रत्यनात अपयश आले तरी वारंवार प्रयत्न करत राहावा एक दिवस यश शोधत येणार असल्याचे महेश रोकडे यांनी सांगितले.
सर्वच क्षेत्रात स्पर्धा असताना संत तुकाराम व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास व सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळणार असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक फिरोज मुलाणी यांनी सांगितले.
वीस विध्यार्थी व विद्यार्थ्यांना पाच लाखा पर्यंत च्या शिष्यवृत्ती चे वाटप करण्यात येत असल्याचे सांगून जिजाऊ करिअर सेन्टर च्या कार्याची माहिती अध्यक्ष नामदेवराव तुपे यांनी सांगितले.
शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभव कथन करून. कृतज्ञता व्यक्त केली
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील केले व आभार देवेंद्र शिर्के यांनी मानले