महाराज चषक क्रिकेट स्पर्धेचे पर्व दुसरे लवकरच श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकूल येथे

फलटण टुडे (फलटण) :-
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील नामांकित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ( महाराज चषक )याही वर्षी सन 2023 / 24 दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक 08 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत.
राजे ग्रुप आयोजित व आर एस पी वॉरियर्स फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे कमिंग सून प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र ॲम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 09 ऑक्टोंबर 2023 करण्यात आले .
यावेळी स्पर्धेचे आयोजक आर एस पी ग्रुपचे अक्षय साळुंखे ,स्वप्नील शिंदे व ग्रुपचे इतर मान्यवर सदस्य सनी शिंदे किशोरसिंह नाईक निंबाळकर जगन्नाथ कापसे तुषार नाईक निंबाळकर व इतर सहकारी उपस्थित होते
ही स्पर्धा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नोव्हेंबर महिन्यामध्ये आरंभ होईल स्थळ श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकूल रविवार पेठ (घडसोली मैदान ) फलटण येथे होणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक , तृतीय क्रमांक अशी चार बक्षीस व वैयक्तिक भरघोस बक्षिसे व वैयक्तिक बक्षिसे यांचा समावेश असेल .
अशी माहिती आयोजक अक्षय साळूंखे व स्वप्निल शिंदे यांनी दिली .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!