तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

   मुधोजी हायस्कूल ,फलटणच्या  सतरा वर्षे वयोगट (मुले ) या संघाने प्रथम क्रमांक संपादन केला


फलटण ‌टुडे (मलठण ) : –

 फलटण तालुका शालेय क्रीडा विभाग फलटण आणि श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज , मलठण , फलटण यांच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या फलटण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
सलग तीन दिवस १४, १७ आणि १९ वय वर्ष वयोगटातील मुल व मुलींचे कबड्डीचे सामने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब तथा महादेव नामदेव भोसले, अशोकराव भोसले, रवींद्र बर्गे, बाळासाहेब घनवट, शरदशेठ सोनवणे, बाळासाहेब कुंभार, आबा नेवसे यांच्या हस्ते शुभारंभ होऊन सुरू झालेल्या या स्पर्धामध्ये १९ वर्षाखालील १३ संघ, सतरा वर्षाखालील ७३ आणि १४ वर्षाखालील ६५ संघ असे एकूण १५१ संघ सहभागी झाले होते. यामध्ये १४ वर्षे मुलांच्या वयोगटात जिल्हा परिषद शाळा मठाचीवाडी प्रथम तर सुरवडी हायस्कूल सुरवडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात ढवळ हायस्कूल ढवळ प्रथम तर महात्मा फुले हायस्कूल सासवड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सतरा वर्षे वयोगटात मुलांमध्ये मुधोजी हायस्कूल फलटण यांनी प्रथम क्रमांक तर सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी यांनी प्रथम तर श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षे वयोगटांमध्ये मुलांमध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज बीबी यांनी प्रथम क्रमांक तर यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर मुलींच्या संघात मुधोजी कॉलेज फलटण यांनी प्रथम क्रमांक तर यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांकाच्या संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रणदेव खराडे, कै मल्हारराव सस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी, सौ. मथूबाई सावंत विद्यालय उपळवेचे मुख्याध्यापक शिवाजी पवार आणि चौधरवाडी हायस्कूल चौधरवाडीचे मुख्याध्यापक अजित गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. 
या स्पर्धेत फलटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ सोनवलकर, उत्तम घोरपडे, गोरख कदम, संभाजी चोरमले, आप्पासाहेब वाघमोडे, पंकज पवार, अप्पा वाघमारे, संदीप ढेंबरे, तुषार मोहिते, हिंदुराव लोखंडे, संजय करणे, खताळ सर, मारकड सर आणि सर्व क्रीडा शिक्षक यांनी पंच म्हणून कार्य पार पाडले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फलटण तालुका क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ लोखंडे, प्रा. सतीश जंगम, वासुदेव सुपे, प्रा. रवींद्र कोकरे, रविंद्र शिंदे, मारुती भिसे, रवींद्र लडकत, कांतीलाल चव्हाण, संजय शिंदे, सौ. शुभांगी गायकवाड, सौ. संध्याराणी शिंदे, सौ. उर्मिला घाडगे, सौ. मीना नेवसे, देविदास कदम, बजरंग गायकवाड, विश्वास घनवट, व्ही टी पवार, सुनील केंजळे यांच्यासह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षक सेवक कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!